पंढरपूर (प्रतिनिधी) ः - पंढरपूरमधील भक्तीमार्गावरील देशमुख मठ येथे रहाणार्या 45 वर्षाच्या महिलेवर दोघाजणांनी सामुहीक बलात्कार केल्याची घटना आज दि. 23 जुलै 2016 रोजी पहाटे घडली आहे. हा गुन्हा घडल्याचे वृत्त समजताच सोलापूर ग्रामीण चे पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडीत महिलेची विचारपुस केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, एका आरोपीस अटक केली असून दुसर्या आरोपीलाही लवकरच ताब्यात घेऊन या गुन्ह्याचा तपास जलद गतीने करण्यात येईल. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नावंदे आदी हजर होते.
याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात सबंधीत महिलेने फिर्याद दाखल केली असून शहर पोलिसांकडून समजलेल्या सविस्तर वृत्तानुसार वरील ठिकाणी आरोपी ढोबळ्या उर्फ सुरेश शिंगाडे (वय-34) व एक अनोळखी अशा दोन आरोपींनी संबंधीत महिलेच्या घरात प्रवेश करुन संगनमताने शिवीगाळ व दमदाटी करुन तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने सामुहिक बलात्कार केला.
आरोपींवर 376 कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून आरोपींपैकी ढोबळ्या उर्फ सुरेश शिंगाडे यांस शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फरारी आहे. पुढील तपास पीएसआय बल्लाळ हे करीत आहेत.
बघा खालील व्हिडीओ काय म्हणाले एसपी विरेश प्रभु...
आरोपींवर 376 कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून आरोपींपैकी ढोबळ्या उर्फ सुरेश शिंगाडे यांस शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फरारी आहे. पुढील तपास पीएसआय बल्लाळ हे करीत आहेत.


0 Comments