चंद्रभागेच्या पात्रात आढळला बेवारस मृतदेह

पंढरपूर (प्रतिनिधी) ः -  आज दि. 24 जुलै 2016 रोजी चंद्रभागेच्या पात्रात दगडी पुलाशेजारील नविन पुलाजवळ एक पुरुष जातीचा बेवारस मृतदेह आढळुन आला असून याबाबतची खबर शहर पोलिस ठाण्यात गणेश मधुकर अंकुशराव यांनी दिली आहे.
शहर पोलिसांकडून समजलेल्या वृत्तानुसार आज दुपारी दीड वाजणेच्या सुमारास चंद्रभागेच्या पात्रातील नविन पुलानजीक  इसमाचा मृतदेह आढळून आला असून  पाण्यात बुडून त्याचा मृत्यु झाला असल्याचा प्राथमीक अंदाज शहर पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. 

Post a Comment

0 Comments