स्वातंत्र्यदिनी पंढरपूर तहसिल कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्न


पंढरपूर,दि.15: स्वातंत्र्याच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसील कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी संजय तेली यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी तहसिलदार नागेश पाटील, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, पंचायत समितीचे उपसभापती विष्णु बागल, नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर नागरिक, पदाधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर पोलीस पथकाने मानवंदना दिली.

00000

Post a Comment

0 Comments