विधानसभेत दिवंगत सदस्यांना शोक प्रस्तावाद्वारे आदराजंली


 मुंबईदि. 6 : माजी विधानसभा सदस्य जांबुवंतराव बापुरावजी धोटेॲड. चंद्रकांत मोहनलाल छाजेड, आनंदराव कोंडिबा देसाईपुंजाजी बापुजी कडू- पाटीलमाणिकराव उर्फ रावसाहेब रामचंद्र आपोतीकरवामनराव उर्फ बाबासाहेब बाजीराव भोकरेबाबुसिंग दगडूसिंग राठोडचंद्रशेखर धोंडिबा भोसले या विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना आज विधानसभेत शोकप्रस्तावाद्वारे आदरांजली अर्पण करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला.  त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारेविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,सदस्य सर्वश्री अजित पवारगणपतराव देशमुखअमित देशमुखजीवा पांडू गावित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments