आक्रोश करण्याऐवजी आक्रमक व्हा ! केरळमधील हल्ल्याच्या निषेधार्थ आक्रोश सभेत वक्त्यांचा सूर


पंढरपूर (प्रतिनिधी):- गेली अनेक वर्षे केरळ मधे..रा.स्व.संघ/भा.ज.प.व हिंदूत्वनीष्ठ कार्यकर्त्यांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचेे कार्यकर्ते कडून प्राणघातक हल्ले होत  आहेत...यातच तेथे गत मार्च महिन्यात मा.क.प.चा मुख्यमंत्री आल्यापासून यात प्रचंड  प्रमाणात वाढ झाली आहे...त्याचा निषेध म्हणून काल पंढरपूर येथील शिवाजी चौक येथे जाहीर आक्रोश ..निषेध सभा घेण्यात आली. या वेळी रा.स्व.संघ/भा.ज..प./वि.हिं.प./विद्यार्थी परिषद/हिंदू महासभा/दुर्गा वाहिनी/वनवासी कल्याण आश्रम...शिवभक्त मंडळ इ. हिंदुत्वनिष्ठ संघटसीं नांनी जाहिर निषेध नोंदवला....या वेळी सा.महापर्व व सम्यक क्रांती मंचच्या श्री.काले व श्री.लोंढे यांनी सुध्दा निषेध व्यक्त केला.

सभेचे प्रास्तविक जिल्हा कार्यवाह मा.सचिन शिंदे यांनी केले. तुकाराम खंदाडे यांनी स्वागत व आभार मानले. संतोष दामोदरे यांनी सूत्रसंचलन केले...सभा यशस्वी
करण्यासाठी..राजेश दंडे सर ..धनंजय जोगदेव..ओंकार वैद्य..रामेश्‍वर कोरे, सौरभ
थिटे, प्रशांत सापनेकर...इ कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले...मा.नायब तहसिलदार श्री. पवार
साो. यांना निवेदन दिले.

Post a Comment

0 Comments