पंढरपूरहून विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भविकांवर काळाचा घाला.... सांगलीत भीषण अपघात, देवदर्शनाहून परतणाऱ्या 6 भाविकांचा जागीच मृत्यू...

पंढरपूरहून विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भविकांवर काळाचा घाला....
सांगलीत भीषण अपघात, देवदर्शनाहून परतणाऱ्या 6 भाविकांचा जागीच मृत्यू...

21 Apr. 2017

सांगली : पंढरपूरहून विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भविकांवर काळाने घाला घातला. मिरज-पंढरपूर मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

सांगलीतील कवठेमहाकाळ तालुक्यातील आगळगाव फाट्याजवळ पहाटे चार वाजता भीषण दुर्घटना घडली. पंढरपूरहून विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले आहेत.
पंढरपूरहून परतत असताना मिरज-पंढरपूर मार्गावर भाविकांच्या मिनी ट्रॅव्हल्सने रस्त्यावर उभा असलेल्या वाळूच्या ट्रकला धडक दिल्याने दुर्घटना घडली. मात्र, अपघाताचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

Post a Comment

0 Comments