दिल्लीचे तख्तही भाजपाने जिंकले..! तिन्ही महापालिकांमध्ये स्पष्ट बहुमत... आम आदमी पक्षाला धक्का!

नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिकांच्या एकूण 270 जागांसाठी आज (बुधवारी) मतमोजणी झाली. यात भारतीय जनता पक्षाने सर्वच्या सर्व तिन्ही महानगरपालिकांमध्ये बहुमत मिळवत आप आणि काँग्रेसच्या अकांक्षावर झाडू फिरवला. भाजप, आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये झालेल्या या तिरंगी लढतीत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.
एकूण तिन्हा मनपातील आकडेवारी
पक्षतिन्ही मनपाकोण किती पुढे
भाजप18543
काँग्रेस2810
आप4612
इतर115
54 टक्के मतदानाची नोंद
- दिल्ली महानगरपालिकेसाठी 23 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची टक्केवारी 54% एवढी नोंदवण्यात आली. पूर्व दिल्लीतील मौजपूर आणि उत्तर दिल्ली मनपातील सराय पीपल थाला या ठिकाणी उमेदवारांच्या निधनामुळे दोन्ही वार्डांत निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
दिल्लीतील तीन महापालिकांच्या निवडणुकीत प्रत्यक्षात एकूण 272 वॉर्डांमध्ये निवडणूक झाली. मात्र, यापैकी दोन वॉर्डांमध्ये उमेदवारांचे निधन झाल्याने तेथील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली. उर्वरित 270 वॉर्डांसाठी 2,537 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातही उत्तर दिल्लीत सर्वाधिक 104 वॉर्डांवर 1,004 उमेदवार रिंगणात होते.

पूर्व दिल्ली महापालिका
येथे एकूण 63 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप विजयाकडे वाटचाल करत आहे. भाजप 46, काँग्रेस 5 आणि आप 9 जागांवर विजयी झेप घेण्यासाठी आघाडीवर आहेत. इतर पक्ष-अपक्षांनी 3 जागा निश्चित केल्या.
उत्तर दिल्ली महापालिका
उत्तर दिल्ली महापालिकेत 103 जागांपैकी भाजपचे 63 नगरसेवक विजयी झाले आहेत. आम आदमी पक्ष 23 नगसेवकांसह दुसऱ्या क्रमांकाचा आणि काँग्रेसला 14 जागांवर आघाडी घेऊन तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर अपक्ष आणि इतरांनी 3 जागा मिळवल्या आहेत.
दक्षिण दिल्ली महापालिकेचे निकाल
या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. 104 पैकी तब्बल 71 जागा भाजपने काबिज केल्या आहेत. तर काँग्रेसचे 12 आणि आम आदमी पक्षाचे 15 नगरसेवक निवडून आले आहेत. अपक्ष आणि इतर 6 उमेदवारांचा विजय झाला. 

Post a Comment

0 Comments