महाराष्ट्र दिनी तहसिल कार्यालय येथे शासकीय ध्वजारोहनाचा समारंभ


    पंढरपूर, दि. 27 :-  महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापनदिना निमित्त सोमवार दिनांक 1 मे 2017 रोजी शासकीय ध्वजारोहनाचा समारंभ सकाळी 8.00 वाजता आमदार भारत भालके यांच्या हस्ते  तहसिल कार्यालय पंढरपूर येथे संपन्न होणार  आहे.
 या समारंभास उपविभागीय अधिकारी संजय तेली उपस्थित राहणार असून मान्यवर पदाधिकारी, स्वातंत्र सैनिक तसेच शासकीय अधिकारी-कर्मचारी व नागरीकांनी  उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार अनिल कारंडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments