राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुणे येथून दिल्लीकडे प्रयाण
पुणे दि. १५ (विमाका): राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज अहमदनगर येथून भारतीय वायू सेनेच्या हेलिकॉप्टरने दुपारी बारा वाजेच्या सुमारास पुणे येथील लोहगांव विमानतळावर आगमन झाले.
यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांनी राष्ट्रपतीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे आदींनी त्यांचे स्वागत केले. त्यांनतर राष्ट्रपतींचे भारतीय वायुसेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रयाण झाले.
0 Comments