नंदेश्‍वर गावातील दारूबंदी खरचं यशस्वी होईल का ? पोलिस प्रशासनाने गावक-यांच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज

Pandharpur Live 24 April 2017

मंगळवेढा/प्रतिनिधी
न्यायालयाच्या निर्णयाने गावातील सरकार मान्य देशी दारूचे दुकान बंद झाले परंतू या निर्णयाने घडले उलटेच... त्याचे असे झाले की,  नंदेश्‍वर ता.मंगळवेढा या गावात शासनमान्य देशी दारूचे दुकान होते परंतू न्यायालयाचा निर्णय व अन्य काही कारणास्तव देशी दारूचे दुकान बंद झाले. परंतू हे दुकान बंद झाल्यानंतर गावातील गल्लोगल्ली दारूची दुकाने उघडण्यात आली. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयामुळे देशी दारूचे दुकान बंद झाले आहे. अशी चर्चा रंगली, त्यामुळे गावातील सुजान नागरीक व महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात होते. परंतू लागलीच दारूची दुकाने  वाढल्यामुळे या आनंदावर विरजन पडले गेले आणि गावात तळीराम दारूडयांचे पहिले पाढे पंचावन अशी परिस्थिती गावात निर्माण झाली. ही बाब गंभीर असून याकडे आता मंगळवेढा तालुका पोलिसांनी अथवा सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षकांनी स्वत:च लक्ष घालणे आवश्यक बनले आहे.

त्यामुळे नंदेश्‍वर ता.मंगळवेढा ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांनी सरपंचाच्या नेतृत्वाखाली पोलिस उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे, तहसिलदार अशिष शेलार, उत्पादन शुल्क अधिकारी, पोलिस निरिक्षक यांना निवेदन देवून गावातील दारू बरोबरच सर्व अवैद्य धंदे तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे काही ठिकाणी मंगळवेढा पोलिसांनी धाडी टाकून कारवाई केली परंतू काही ठिकाणी चोरी चोरी चुपके चुपके दारू विकली जाते. देशी दारूचा दर 50 रूपयावरून चक्क 80 रूपयापर्यंत गेले यामुळे आपोआपच दारू पिणा-यांच्या संख्येत घट होवू लागली आहे. आता ग्रामपंचायतीचे पदाधिकारी या चोरटया दारू विक्रेत्यावर नजर ठेवून आहेत अनेक दिवसापासून नंदेश्‍वरचा आठवडा बाजार विणा भांडणतंटयाचा झाला आहे. त्यामुळे नंदेश्‍वरच्या ग्रामस्थाबरोबरच इतर गावचे नागरिकही चांगलेच सुखावले आहेत. आता या दारूबंदी विरोधात आवाज चांगलाच वाढू लागला असून 1 मे रोजी ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात येणार असल्याचे समजते त्यामुळे नंदेश्‍वरच्या दारूबंदीच्या मागणीला मंगळवेढा पोलिसांनी लक्ष घालून कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments