राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मंत्रालयात आली चक्कर

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मंत्रालयात आली चक्कर 10 May.2017
मुंबई- मणक्याचे दुखणे व आतड्याशी निगडित आजारांनी त्रस्त असलेले राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे मंगळवारी सायंकाळी मंत्रालयात चक्कर येऊन कोसळले. सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनात हा प्रकार झाला. डाॅक्टरांना तातडीने पाचारण करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना त्यांच्या बंगल्यावर नेण्यात आले. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीचा दिवस असल्याने मंत्रालयात मोठी गर्दी होती. सदाभाऊंना भेटण्यासाठी अनेक लोक त्यांच्या दालनात आले होते. लोकांना भेटत असतानाच त्यांना चक्कर अाली. अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरित डाॅक्टरांना बाेलावले. यापूर्वीही सदाभाऊंना दौऱ्यावर चक्कर आली होती.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments