माजी सरपंच रणवरे यांची जळीत घराला भेट-घर बांधणीसाठी देणार एक ट्रॉली वीट

निमसाखर, दि. 11- हगारवाडी (ता. इंदापूर ) येथील बापुराव कांबळे या युवकाच्या घराला आग लागून संसारोपयोगी वस्तूंसह त्याचे सर्वकाही भस्मसात झाले होते. या कुटुंबाला माणुसकीच्या नात्याने घर उभारता यावे या उदात्त हेतूने निमसाखर गावचे माजी सरपंच गोविंद रणवरे यांनी एक ट्रॉली बांधकामासाठीची वीट देण्याचे घटनास्थळी भेट देऊन आश्वासन दिले आहे. शुक्रवारी (दि. 5) दुपारी बापुराव कांबळे यांच्या घराला अचानक आग लागली. प्रसंगावधान राखून त्यांच्या पत्नी सविता कांबळे यांनी आपल्या तीन मुलांना बाहेर काढले; परंतु वाऱ्यामुळे आग मोठ्याप्रमाणावर पसरली आणि काही वेळातच संपूर्ण घर भस्मसात झाले. यात कांबळे यांचा संसार पूर्णपणे उघड्यावर आला आहे. या आगीत कांबळे यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कांबळे यांच्या कुटुंबाने सांगितले आहे. या घटनेचे वृत्त समजताच निमसाखर गावचे माजी सरपंच गोविंद रणवरे यांनी कांबळे यांच्या जळीत घराला भेट दिली. यावेळी रणवे यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदतीचा हात पुढे करत घर बांधणीसाठी एक ट्रॉली बांधकामासाठीची वीट देण्याचे आश्वासन कांबळे यांना दिले. यावेळी हगारवाडीचे माजी सरपंच गणपत हगारे, पांडुरंग हगारे, निमसाखरचे उपसरंच संजय जाधव, शांताराम रणवरे, गणेश पवार, प्रदीप रणमोडे आणि अन्य नागरिक उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments