तीर्थपुरी-घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी शिवारातील जायकवाडीच्या डाव्या कालव्यात प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत खाती उघडून जारी केलेले एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड फेकून दिल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तीर्थपुरी येथील रामेश्वर सिरसाठ व धनंजय कवडे हे दोघे मित्र जायकवाडीच्या डाव्या कालव्याजवळ फिरायला गेले होते. त्याच वेळी त्यांना कालव्याच्या बाजूलाच एसबीआय बँकेचे शेकडो एटीएम कार्ड पाण्यात पडल्याचे दिसून अाले. ग्रामस्थांनी कालव्याकडे धाव घेत आपापले व नातेवाइकांच्या नावाचे कार्ड शोधून घेतले. दरम्यान, तीर्थपुरी येथील एसबीआय बँक शाखेअंतर्गत २५ ते ३० बँक मित्र अाहेत. त्यापैकीच कोणीतरी हे एटीएम कार्ड संबंधित खातेदारांना वाटप न करता कालव्यात फेकून दिले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे
- हे खाते जन-धन योजनेत उघडल्यास त्यांना बँकिंगशिवाय इतरही काही सुविधा प्राप्त होणार आहेत. त्यामुळे साधी खाती उघडण्यापेक्षा जन-धनच्या खात्यांना नागरिकांची प्राथमिकता आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





0 Comments