दिंडीर वन ते लोकमान्य विद्यालय नदीकाठावरील तटाची उंची वाढविण्याची मागणी


 अदिम विकास परिषदेच्या वतीने निवेदन 

 तात्पुरत्या स्वरुपात बॅरीकेटींग करण्याचे मुख्याधिकार्‍यांचे आश्‍वासन 


   पंढरपूर शहरातील दिंडीरवन हे पुरातन काळापासून धार्मिक महत्व असलेेले स्थान असून या ठिकाणी असलेल्या रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.येथील चंद्रभागेच्या तीरावर पुर्वी रस्त्यापासून चार फूट उंचीची दगडी तटबंदी होती.मात्र पुढे रस्त्याची उंची वाढत गेल्याने आता ही तटबंदी रस्त्याच्या समांतर उंचीची झाली आहे.             

या ठिकाणचा रस्ता हा अतिशय अरुंद असून भाविकांची गर्दी मोठी असते.या पुर्वी या ठिकाणी तटावरुन खाली पडून अनेक भाविक जख्मी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे नगर पालीकेने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या तटाची उंची वाढवावी अशी मागणी अदिम विकास परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद पंढरपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे.

     या परिसरात मठांची संख्या मोठया प्रमाणाात असल्याने भाविकांची मोठी गर्दी होते. येथील रस्ता अरुंद असून रस्त्यालगतच वीस फूट खोल नदीचे पात्र आहे.गर्दीच्या वेळी तोल जावून पडण्याचे प्रकार यापुर्वी घडले आहेत.त्यामूळे संभाव्य धोका लक्षात घेवून या तटबंदीची उंची वाढीवणे गरजेचे झाले आहे.तरी नगर पालीकेने याबाबत तातडीने उपाय योजना करावी तसेच आता आषाढी यात्रा कालावधीत या ठिकानी किमान तात्पुरत्या स्वरुपात बॅरेकेटींग करुन धोका टाळावा अशी मागणी आपण केली असल्याची माहीती जिल्हा उपाध्यक्ष नागेश अधटराव यांनी दिली आहे.हे निवेदन देताना शिवराज ननवरे,प्रशांत परचंडे,विकी सगर,निलेश माने,गोटू जुमाळे आदी उपस्थित होते.

यात्रा कालावधीत तात्पुरत्या स्वरुपात बॅरीकेटींग करु तर यात्रेनंतर तटाची उंची वाढवू - मुख्याधिकार्‍यांचे आश्‍वासन 

- हे निवेदन दिल्यानंतर  विषयाचे गार्भिंय लक्षात घेवून आपण या ठिकानी तातडीने  बॅरीकेटींग करु तर यात्रे नंतर येथील तटबंदीची उंची वाढविण्याबाबत कार्यवाही करु अशा आशयाचे आश्‍वासन यावेळी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिले आहे.     

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments