रासायनिक खतांवर फक्त 5 टक्के कर, जीएसटी लाँचिंगपूर्वी मोठा निर्णय

नवी दिल्ली : देशात जीएसटी लागू होण्यापूर्वी जीएसटी कौन्सिलने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रासायनिक खतांवर आकारण्यात आलेला 12 टक्के कर रद्द करुन तो आता 5 टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी रासायनिक खतांना 12 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये ठेवण्यात आलं होतं.
अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या 18 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जीएसटीमध्ये रासायनिक खतांना 12 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये ठेवण्यात आल्यामुळे देशभरातून विविध प्रतिनिधींनी हा कर कमी करावा, अशी मागणी केली होती.
रासायनिक खतांवरील कर कमी करण्यात आल्याने त्याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होणार आहे. 12 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये रासायनिक खतं ठेवल्यामुळे खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता होती.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments