प्रशांत वेळापुरे यांना भारत संचार निगमच्या उपमहाप्रबंधक पदी बढती...
नवासारी गुजरात येथे पदभार स्विकारला
पंढरपूर येथे भारत संचार निगमच्या उपजिल्हा प्रबंधकपदी अतिशय उल्लेखनिय कामगीरी केलेेले तसेच साहित्यीक क्षेत्र,सिनेपटकथा,मराठी गझलकार,कवी अशा विविध क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केलेले प्रशांत वेळापुरे यांची भारत संचार निगमच्या नवासारी गुजरात येेथे उपमहाप्रबंधक म्हनून पदोन्नतीवर बदली झाली आहे.
प्रशांत वेळापुरे यांनी बीएसएनएल च्या पंढरपूर विभागाचा कारभार गेल्या चार वर्षापासुन चोखपणे संभाळला होता.ग्राहकांशी थेट संपर्क करुन त्यांच्या समस्या जाणूण घेण्याच्या त्यांच्या कार्यपध्दतीमुळे त्यांच्या कार्यकाळात सोलापूर जिल्ह्यातील इतर विभागापेक्षा पंढरपूर विभागाने अतिशय दमदार कामगीरी केली आहे.वेळापुरे यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहल्या असुन त्याच बरोबर मराठी गझल प्रकारात त्यांनी नवनविन प्रयोग करुन आपले वेगळे स्थान निर्माण केले.त्यांनी अंदमान येथेही तीन वर्षे सेवा बजावली होती.त्यांच्या बढतीचे वृत्त समजताच पंढरपूरातील विविध मान्यवरांकडुन तसेच बीएसएनएल च्या अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून त्यंाचे अभिनंदन करण्यात आले.
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा











0 Comments