वाळू चोराला बसस्थानक स्वच्छ करण्याची शिक्षा दिवाणी न्यायालयाचा निकाल : ३ हजार रुपये दंड

वाळू चोराला बसस्थानक स्वच्छ करण्याची शिक्षा

दिवाणी न्यायालयाचा निकाल : ३ हजार रुपये दंड

 

(पंढरपूर) :  चंद्रभागा नदी पात्रातील वाळूचे अवैधरित्या उत्खनन करुन विक्री करणाºया वाळू चोरास गुरुवारी प्रथम वर्ग न्यायालयाने ३ हजार रुपये दंड व एक दिवस बसस्थानक आणि तीन दिवस न्यायालयाची स्वच्छता करण्याची शिक्षा सूनावली आहे. नागनाथ किसन पवार (रा. पंढरपूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

१७ आॅगस्ट २०१४ रोजी सायंकाळी ७  वाजण्याच्या सुमारास पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगण येथील रोडवर आरोपी नागनाथ किसन पवार (रा. जुनी वडार गल्ली, पंढरपूर) हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर नं. एम. एच. १२ जी. ए. २७३८ चे पाठीमागे जोडलेल्या बिगर नंबरचे डंपिंग ट्रॉलीमध्ये विनापरवाना, बेकायदेशीरपणे चोरुन १ ब्रास वाळू चोरुन वाहतूक करीत होता़ तेव्हा सपोनि नीलेश बडाख यांच्या पथकास रंगेहात सापडला होता. त्याच्याविरुध्द भा.द.वि. क. ३७९ अन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणात सरकारपक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता एन. वाय. साबळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन मे. कोर्ट नं. ३ न्यायाधीश आर. ए. शिंदे यांनी आरोपीस दोषी ठरविले. आरोपीस प्रोबेशन आॅफ आॅफेडर अ‍ॅक्टचा फायदा देऊन १ वर्ष चांगले वर्तणुकीचा बंधपत्र देण्यास सुचित केले. तसेच ३ हजार रुपये दंड व सोबत कम्युनिटी सर्व्हिस म्हणून २१ ते २४ जूलै न्यायालयाचा आवार स्वच्छ करणे. २५ जलै २०१७ रोजी बस स्थानक स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावली आहे. याकामी न्यायालय आदेश सपोफौ  मोमीन व न्यायालय पैरवी सपोफौ एम. ए. गायकवाड मदत केली.

तसेच १ वर्षाच्या काळात आरोपीने नम्रपणे व शांततेत राहावे. वाईट वृत्तीचे लोकांपासून दूर रहावे. कोणताही गुन्हा करु नये. मादक द्रव्याचे सेवन करु नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत़

जाहिरात 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111














  




































Post a Comment

0 Comments