आता सरपंच निवड थेट जनतेतून; मंत्रीमंडळाचा निर्णय



नवी दिल्ली : 
या पुढे ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे. राज्य मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये साधारण ८ हजार ग्रामपंचायत निवडणुकांसाठी हा निर्णय लागू होणार आहे. 
राज्यात एकूण २९ हजार ग्रामपंचायती आहेत. सरकार या निर्णयाचा वटहुकूम लवकरच काढून त्याचा कायदा पास करून घेणार आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये असा निर्णय यापूर्वीच घेतला गेला आहे.
मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय 

  • सरपंचाचे अधिकार वाढले
  • गावाचा अर्थसंकल्प बनवण्याचा अधिकार सरपंचाकडे
  • ग्रामसभा अर्थसंकल्प मंजूर करणार
  • ग्रामसभेचे सुद्धा अधिकार वाढवले
  • सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी ७ वी पास ही पात्रता
  • १९९५ नंतर इच्छुकांना ही अट लागू, त्यापूर्वी जन्म झालेल्यांना ही अट लागुय नाही 


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
 
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments