आता ओढ दर्शनाची  पालख्यांचा मुक्काम वाखरीत  




पंढरपूर दि. 02 :-  भेटीलागीं जीवा लागलीसे आस ...| पाहे रात्रं-दिवस वाट तुझी ||   सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी धरुन देहू, आळंदीसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी निघालेल्या पालख्या आज पंढरीपासून जवळच वाखरीत मुक्कामासाठी दाखल झाल्या आहेत.  संतांच्या पालख्यासह वैष्णवांचा मेळा उद्या पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे.

विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषात  वारकरी देहभान विसरून पंढरीच्या वाटेवर चालत आहे. चंद्रभागेमध्ये स्नान व विठ्ठल दर्शनाच्या ओढीने येत असलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहाने अवघी पंढरी हरी नामाने दुमदुली व  भक्ती रसात न्हाऊन निघाली आहे.

लाखो नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा


बाजीराव विहीर येथे आज माऊलींचे गोल व उभे रिंगण पार पडले. हा रिंगण सोहळा लाखो वारकरी भविकांनी अनुभवला. अश्वाचे रिंगणामध्ये धावणे हा क्षण आपल्या नजरेत साठवून ठेवण्यासाठी वारकरी भाविक अतुर झालेला दिसून येत होता.  विठ्ठल नामाच्या गजरात समस्थ वारकरी  भक्ती रसात चिंब भिजले होते. सावळ्या विठ्ठलाचे रुप पाहण्यासाठी आणि त्यांच्या दर्शनासाठी अतुरलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदही ओसांडून वाहत होता.  यावेळी  बाजीराव विहीर परिसरात माऊलीच्या दर्शनासाठी वारकरी भाविकांनी गर्दी केली होती.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments