सांगलीत कार अपघातात तीन तरुण ठार

सांगली- मिरज रस्त्यावर झाला अपघात


सांगलीतील पाच तरुण पार्टीसाठी मिरजला गेले होते.

सांगली- मिरज रस्त्यावर गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला. नियंत्रण सुटलेली कार झाडावर आदळल्याने तीन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. निनाद आरवाडे, विकी चव्हाण, संमेद निल्ले अशी या तरुणांची नावे आहे. या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सांगलीतील पाच तरुण गुरुवारी रात्री पार्टीसाठी मिरजला गेले होते. मिरजवरुन परतत असताना पहाटे तीनच्या सुमारास सांगली- मिरज रस्त्यावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडावर जाऊन आदळली. यात तिघांचा मृत्यू झाला. तर कारचालक आणि त्याच्या मागे बसलेला तरुण जखमी झाला. मृतांपैकी निनाद हा कंत्राटदार होता. तर उर्वरित तरुणही इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत होते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.






  






















































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Post a Comment

0 Comments