मुंबई - ग्रामपंचायतीने थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून विरोध केला. ते महापालिकेच्या सभागृहात बोलत होते. सरपंच थेट जनतेतून निवडणार असाल तर मग मुख्यमंत्री सुद्धा थेट जनतेतूनच का निवडू नये असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे. यासोबतच महापालिकेत भाजप नगरसेवकाला सेनेकडून मारहाण झाल्याची आपल्याला काहीही माहिती नाही, असे म्हणत ठाकरेंनी वादातून हात झटकले आहेत.
भाजप सरकारने यापूर्वी नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने भाजपला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आणि त्यांचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले. याच धर्तीवर सरपंचाची निवडही थेट जनतेनेच करावी, असा निर्णय सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला शिवसेनेचे मंत्रीही उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी जाहीरपणे काहीच भूमिका घेतली नाही.
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा












0 Comments