शैक्षणिक वर्षाच्या आरंभीच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, नव्या कायद्यानुसार असे करणारे पहिले विद्यापीठ

शैक्षणिक वर्षाच्या आरंभीच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, नव्या कायद्यानुसार असे करणारे पहिले विद्यापीठ
 20 Jul.2017

सोलापूर- सोलापूर विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमांच्या ऑक्टोबर १७ तसेच मार्च १८ या दोन्ही सत्रातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणारे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. नव्या विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठाने अंमलबजावणी केली आहे.
ऑक्टोबर २०१७ मधील बी ए, बी. कॉम. वर्गाच्या परीक्षा २४ ऑक्टोबर बी.एस्सी वर्गाच्या परीक्षा ३१ ऑक्टोबरपासून सुरू होतील. एमए, एमएस्सी, एम कॉम वर्गाच्या परीक्षा १८ नोव्हेंबरपासून तर अभियांत्रिकीच्या परीक्षा या २८ नोव्हेंबरपासून सुरू होतील.
मार्च २०१८ मध्ये बी ए, बी. कॉम. परीक्षा २१ मार्च, बी.एस्सी परीक्षा २७ मार्च, एम.ए, एम कॉम, एमएस्सी परीक्षा १८ एप्रिल तर अभियांत्रिकीच्या परीक्षा या मेपासून सुरू होतील.

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचेनियोजन करणे सोयीचे होईल. इतर विद्यापीठाच्या तुलनेत सोलापूर अग्रेसर ठरले.”
- बी.पी. पाटील, संचालक, परीक्षा विकास मंडळ, सोलापूर विद्यापीठ

जाहिरात 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111














  


















































Post a Comment

0 Comments