माहितीच्या अधिकाराची माहिती का मागितली म्हणून सरपंच कडून मारहाण....न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा,

प्रतिनिधी पंढरपूर:

माहितीच्या अधिकाराची माहिती का मागितली म्हणून पंढरपूर तालुक्यातील विटे या गावातील सरपंच व त्यांचे नातेवाईक यांनी नाना मनोहर कोळी यांना  शनिवारी दिनांक ०८/०७/२०१७ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विटे येथे पुजारी वस्ती या ठिकाणी सरपंच सिंधूबाई महादेव दांडगे यांनी तसेच सौदागर महादेव गायकवाड तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाना कोळी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, 

माहिती अधिकाराच्या अधिकाराखाली ग्रामपंचायत दप्तर तपासणी, घरकुल जागे बाबत ठराव मागणी तसेच विटे पुळूज शिव  रास्ता दुरुस्ती बाबत ठराव याची माहिती मागितली होती.

अशी माहिती का मागितली म्हणून गावातील सरपंच त्यांचे कार्यकर्ते व नातेवाईक यांनी नाना कोळी यांना एकांतात गाठून  जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 

वरील घटनेची  नोंद पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन ला केली गेली आहे. आरोपी वरती पुढील प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ गुन्हा नोंद झाला आहे 

परंतु घटना घडून दोन दिवस पूर्ण होऊन सुद्धा अद्याप पोलीस कारवाई झालेली नाही.
अधिक तपास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पो. चव्हाण हे करत आहेत.

न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा, 

त्या मुळे माझ्या व माझ्या परिवाराला या गावगुंड पासून धोका आहे अशी भीती युक्तभावना नाना कोळी यांनी व्यक्त केली असून मला न्याय न मिळाल्यास मी सहकुटूंब आत्मदहन करेन असे निवेदन पत्र सोलापूर चे पोलीस अधीक्षक तसेच कोल्हापूर चे परिक्षेत्र अधीक्षक नांगरे पाटील यांना करण्यात आले आहे.


  






















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Post a Comment

0 Comments