गुरुपौर्णिमेला आमदार, खासदार आणि मंत्र्यांची 'मातोश्री'कडे पाठ

प्रातिनिधीक फोटो
मुंबई : बाळासाहेब आणि शिवसैनिकांमध्ये गुरु-शिष्याचं नातं होतं. त्यामुळे गुरुपौर्णिमेनिम्मित ‘मातोश्री’वर दरवर्षी मोठी गर्दी होते. या गुरुपौर्णिमेला मोठा इतिहास आहे. मात्र ‘मातोश्री’वर होणारी ही गर्दी यावर्षी ओसरलेली पाहायला मिळली.
शिवसैनिकांची तुरळक गर्दी ‘मातोश्री’वर दिसून आली. मंत्री, खासदार, आमदार आणि नगरसेवक ‘मातोश्री’ला विसरलेत का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कारण आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह मुंबईचे नगरसेवक, शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि संपर्कप्रमुखही ‘मातोश्री’कडे फिरकले नाहीत.
गुरुपौर्णिमेला ‘मातोश्री’बाहेर एक पेटी ठेवली जायची, जी आजही ठेवली जाते. त्या पेटीत गुरुदक्षिणा म्हणून शिवसैनिक पैसे टाकत असत आणि ते पैसे पक्षाचा निधी म्हणून वापरत असत. गुरुपौर्णिमेनिम्मित राज्यभरातले कार्यकर्ते ‘मातोश्री’वर येतात. पण यावेळी ती गर्दी दिसली नाही.



  






















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

  

Post a Comment

0 Comments