उपराष्‍ट्रपतीपदाचे उमेदवार म्‍हणून गोपाळकृष्‍ण गांधी यांची विरोधकांतर्फे निवड


नवी दिल्‍ली- उपराष्‍ट्रपतीपदाच्‍या उमेदवार निवडीसाठी काँग्रेससहीत इतर विरोधी पक्षांची आज संसदेच्‍या लायब्ररी इमारतीमध्‍ये बैठक झाली. बैठकीत गोपाळकृष्‍ण गांधी यांच्‍या नावावर सर्व पक्षांचे एकमत झाल्‍याची माहिती आहे. बैठकीनंतर याची घोषणा केली जाण्‍याची शक्‍यता आहे.
भाजपतर्फे उपराष्‍ट्रपतीपदाच्‍या उमेदवाराची घोषणा 13 किंवा 14 जुलैला होऊ शकते, अशी शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे. भाजपनेतृत्‍वाखालील एनडीएने आणि काँग्रेसप्रणित विरोधी पक्षांनी याआधीच राष्‍ट्रपतीपदासाठी स्‍वतंत्र उमेदवार जाहीर केले आहेत. अशात उपराष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणुकीतही सत्‍ताधारी आणि विरोधकांमध्‍ये जोरदार टक्‍कर पाहायला मिळू शकते.
कोण आहेत गोपाळकृष्‍ण गांधी?
- गोपाळकृष्‍ण गांधी हे महात्‍मा गांधीचे नातू आहेत. राष्‍ट्रपतीपदासाठीदेखील त्‍यांचे नाव चर्चेत होते.
- गोपाळकृष्‍ण गांधी हे 2004 ते 2009 दरम्‍यान पश्चिम बंगालचे राज्‍यपाल होते. ते अशोका विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी प्रमुख आहेत तसेच दक्षिण आफ्रीकेत भारताचे राजदुत म्‍हणूनही त्‍यांनी कार्य केले आहे.
- गोपाळकृष्‍ण गांधी हे गांधी आणि आंबेडकर यांच्‍या विचारांचे अभ्‍यासक म्‍हणून ओळखले जातात.
बैठकीत नितीश कुमार सहभागी नाही
- मंगळवारी झालेल्‍या बैठकीमध्‍ये जदयुचे प्रमुख नितीश कुमार सहभागी झाले नाहीत. त्‍यांच्‍या जागी पक्षाचे वरिष्‍ठ नेते शरद यादव बैठकीस उपस्थित होते.
- मार्क्‍सवादी कम्‍युनिस्‍ट पक्षाचे सिताराम येच्‍युरी, सीपीआयचे डी.राजा, सपाचे सचिव रामगोपाल यादव आणि बसपा पक्षातर्फे सतीश मिश्रा बैठकीला हजेर होते.
- जेडीयुने राष्‍ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्‍ट्रपतीपदासाठी 17 जुलैला निवडणुका होत आहेत.



  




























































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


  

Post a Comment

0 Comments