कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरने राबविले विशेष मतदार नोंदणी अभियान

पंढरपूर: दि. २० - बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी भाग १ मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या व ज्यांना वयाची १८ वर्ष पूर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाकडून मंगळवार दि.१८ जुलै २०१७ रोजी एकदिवसीय विशेष मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन केले होते. 

या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांनी नूतन मतदार नोंदणीचे नमुना-६ फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रासह महाविद्यालयाकडे जमा केले तसेच उर्वरित विद्यार्थ्यांना नमुना-६ चे वाटप करण्यात आले. नमुना-६ भरून घेताना जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर व तहसील कार्यालय, पंढरपूर यांच्या सूचनेप्रमाणे आधार कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, बोनाफाईड प्रमाणपत्र व घरातील व्यक्तीचे मतदान ओळखपत्र अशा कागदपत्राची पडताळणी करण्यात आली. या अभियानचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.जी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. 


हे अभियान यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे चेअरमन प्रा.डॉ. राजाराम राठोड, नोडल अधिकारी प्रा.डॉ. अमर कांबळे, प्रा.डॉ.सौ. एफ.एस. विजापुरे, प्रा.जी.बी. भगत, प्रा.डॉ.ए.एल. शेख व श्री. विकास कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111














  















































Post a Comment

0 Comments