साप्ताहिक झंझावात च्या आषाढी यात्रा विशेषांकाचे प्रकाशन संत एकनाथ महाराजांचे वंशज ह. भ. प. योगीराज महाराज व नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांच्या शुभ हस्ते संपन्न



साप्ताहिक झंझावात चे प्रकाशन

 साप्ताहिक झंझावात चे प्रकाशन

 ह. भ. प. योगीराज महाराज यांचा स्वागत सत्कार करताना पंढरपूर Live चे संपादक भगवान वानखेडे
 ह. भ. प. योगीराज महाराज यांचा स्वागत सत्कार करताना पंढरपूर Live चे संपादक भगवान वानखेडे आणो प्रतिनिधी समाधान वाघ

 ह.भ.प. योगीराज महाराज यांचा सत्कार करताना नगराध्यक्ष सौ. साधनाताई नागेश भोसले
 नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले यांचा सत्कार करताना ह.भ.प. योगीराज महाराज

झंझावात आषाढी यात्रा विशेषांकाचे वाचन करतांना योगीराज महाराज व संपादक भगवान वानखेडे


झंझावात आषाढी यात्रा विशेषांकाचे वाचन करतांना योगीराज महाराज व संपादक भगवान वानखेडे


झंझावात आषाढी यात्रा विशेषांकाचे वाचन करताना नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले

 आषाढी यात्रा विशेषांकाचे वाचन करतांना योगीराज महाराज 


पंढरपूर प्रतिनिधी: 
 साप्ताहिक झंझावात च्या आषाढी यात्रा विशेषांकाचे प्रकाशन संत एकनाथ महाराजांचे 13 वे वंशज ह. भ. प. योगीराज महाराज व नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
हा कार्यक्रम पंढरपूर Live व साप्ताहिक झंझावातच्या कार्यालयात संपन्न झाला.

  साप्ताहिक झंझावातचा आषाढी यात्रा विशेषांक आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठल चरणी अर्पण केला गेला. 
या अंकाचे प्रकाशन एकनाथ महाराजांचे वंशज ह. भ. प. योगीराज महाराज  व पंढरपूरच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले यांचे शुभ हस्ते व्हावे यासाठी संपादक भगवान वानखेडे प्रयत्नशील होते.
त्या नुसार आज यो योग्य जुळून आला, व कार्यालयातच हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
या विशेषणांकामध्ये श्री विठोबाशी निगडित कथा, एकादशी महात्म्य व पंढरपूर तिर्थ क्षेत्राची सविस्तर माहिती आदी लेख वाचून ह. भ. प. योगीराज महाराज यांनी समाधान व्यक्त केले, या वेळी नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांची विठ्ठल रुक्मिनि मंदिर समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल ह. भ. प. योगीराज महाराज यांनी शुभेच्छा दिल्या.

तसेच साप्ताहिक झंझावात व पंढरपूर Live च्या कार्यास ही महाराजांनी शुभेच्छा दिल्या.
नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांनी साप्ताहिक झंझावात व पंढरपूर Live साठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व पंढरपूर Live मधून दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ताज्या घडामोडी बाबत चे कौतुक केले.

या वेळी पंढरपूर Live चे संपादक मा. श्री. भगवान वानखेडे प्रतिनिधी समाधान वाघ, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष बंटी वाघ, विश्वजित भोसले, रियाज शेख व महेश वाघमारे आदी उपस्थित होते.






  






































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Post a Comment

0 Comments