वाशिमच्या कलापथकाला पंढरपुरात भरभरून दाद…..


महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित स्वच्छता दिंडीत वाशिमच्या कलापथकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण होत आहे. यावेळी प्रत्येक कार्यक्रमात स्वच्छतेबाबत नवा संदेश नव्या पध्दतीने देण्यात आला.
लोक कलावंत सुशिलाबाई घुगे यांच्या “जयहरी जयहरी म्हणावं जोरातं…पांडुरंगाच्या भक्तानं संडास बांधावं घरातं” या गीताने संडास बांधण्याचे महत्व पटवुन देण्यात येत आहे. या पथकातील बेबीताई कांबळे यांनी गायलेल्या गीतांना वारकरी भरभरुन दाद देत आहेत. “दिंडी मागं दिंडी कशी चालते जोरातं… अन् स्वच्छता सांभाळा असं साकडं घालते..” या गीतामार्फत स्वच्छतेचा आग्रह धरण्यात येत आहे. माजी जि.प. सदस्य केशव डाखोरे यांनी हलगी वाजवुन स्वच्छतेचा संदेश दिला आहे.

लोककलावंत विलास भालेराव, प्रज्ञानंद भगत, कविनंद गायकवाड, वामन वाणी आणि राजाराम ठाकरे हे या स्वच्छता दिंडीत सहभागी वारकर्‍यांचे प्रभावीपणे मनोरंजनातुन प्रबोधन करीत आहेत.  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी वाशिम जि. प. मार्फत गावागावात असलेल्या कुटुंबांच्या घरी कलावंत पाठवुन गृहभेटी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या मोहिमेदरम्यान आलेल्या अनुभवामुळे या कलावंतांचे सादरीकरण दमदार होत आहे. या स्वच्छता  दिंडीत याचा चांगला परिणाम पहावयास मिळत आहे. राज्यस्तरावर वाशिम जि. प. चा ठसा उमटतांना दिसत आहे.

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा



  
























































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Post a Comment

0 Comments