गोपाळकाला साजरा करुन पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु

पंढरपूर दि. 09: -  आषाढी वारीतील गोपाळकाल्यासाठी गोपाळपूर येथे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषात सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या. गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला ॥  या गजरात  वारकरी, भाविकांनी गोपाळकाला केला.
             संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्‍वर महाराज व जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज, संत सोपानकाकासंत नामदेवसंत मुक्ताबाईसंत एकनाथसंत निवृत्तीनाथ यांच्या पालख्यासह अन्य संतांच्या पालखीचे  गोपाळपुरात आगमनझाल्यानंतर व पालखी विसावल्यानंतर  गोपाळपूर येथे पालख्यांचे स्वागत व पूजा करण्यात आली
 श्री विठ्ठलाची भेट

            पालख्यानी गोपाळकाला गोड केल्यानंतर मानाच्या पालख्या श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदीरात आल्या आणि सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतले. आषाढी वारीच्या सोहळ्यात विठ्ठल दर्शनाची आस पुर्ण झाल्यानंतर जातो माघारी पंढरी नाथा । तुझे दर्शन झाले आता ॥  यानुसार सर्व पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला.


  






















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

  

Post a Comment

0 Comments