विक्रम शिरसट मित्र मंडळाने केली चंद्रभागेच्या पात्राची स्वच्छता..!



* विविध संघटनांनीही घेतला सहभाग *

नुकत्याच पार पडलेल्या आषाढी यात्रेनंतर चंद्रभागेच्या वाळवंटात तसेच पात्रातही प्रचंड घाण झालेली दिसून आली.जिल्ह्यातील विविध शासकिय कर्मचार्‍यांनी एकत्र येत नुकतीच वाळवंटाची साफसफाई केली होती.मात्र चंद्रभागेच्या पात्रात मोठया प्रमाणात वाढलेले शेवाळं तसेचव वस्तु,कपडे,कुजलेले खाद्य पदार्थ यामुळे या पाण्यास मोठी दुर्गंधी सुटली होती.विक्रम शिरसट मित्रमंडळाने सोमवारी विविध संघटनांना सहभागी करुन घेत जेसीबी व हाताच्या सहाय्याने चंद्रभागेच्या पात्राची स्वच्छता केल असून विक्रम शिरसट मित्रमंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

     विष्णूपद बंधार्‍यामुळे भाविकांना स्नानासाठी पाणी उपलब्ध होत असले तरी पाण्याचा प्रवाह थांबलेलाच रहात असल्यामुळे चंद्रभागेच्या पात्रातील पाण्यात पाणगवत तसेच शेवाळ मोठया प्रमाणात निर्माण झाले होते.त्यामुळे  पाण्यास दुर्गधी येत होती.आज विक्रम शिरसट मित्रमंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नदीपात्राची स्वच्छता करण्यासाठी जेसीबी व इतर वाहनांच्या सहाय्याने मोहीम राबवीली.यात वारकरी फडकरी संघटना,बजरंग दल,आण्णाभाऊ साठे युवक संघटना,भिमज्योत तरुण मंडळ,जुना सोलापूर नाका पिपल्स रिपब्लीकन पार्टी यांच्यासह विविध गणेशउत्सव मंडळ यासह नगर पालीकेनेही सहभाग घेतला होता. 


जाहिरात 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111














  



























































Post a Comment

0 Comments