शांती हे सामूहिकउद्दिष्ट बनले पाहिजे ‘ एल्डर डी टॉड ख्रिस्तोफरसन ’ यांचे प्रतिपादन; एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाच्यावतीने “तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर जागतिक शांतता पुरस्कार-2017” ने सन्मानित

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व 
Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ........................................................

‘डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ आणि विश्‍व शांती केंद्र (आळंदी)पुणेतर्फे 9वा ‘तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार 2017’  एल्डर डी. टॉड ख्रिस्तोफरसन यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी डावीकडून प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एल्डर रॉबर्ट विल्सन, फादर फंक, डॉ. रिचर्ड नेल्सन, डॉ. मॅथ्यू हॉलंड, प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, डॉ.मायकेल नोबेल, एल्डर डी. टॉड ख्रिस्तोफरसन, मिसेस ख्रिस्तोफरसन, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. विजय भटकर, प्रा.राहुल विश्‍वनाथ कराड, डॉ. मॅथ्यू हॉलंड, प्रा.सौ. स्वाती कराड-चाटे, श्री. नानिक रूपानी व डॉ. चंद्रकांत पांडव. 


 ‘डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ आणि विश्‍व शांती केंद्र (आळंदी)पुणेतर्फे 9वा ‘तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार 2017’  एल्डर डी. टॉड ख्रिस्तोफरसन यांना सन्मानपत्र प्रदान करताना डावीकडून प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, डॉ.मायकेल नोबेल, एल्डर डी. टॉड ख्रिस्तोफरसन, मिसेस ख्रिस्तोफरसन व प्रा.राहुल विश्‍वनाथ कराड.

 ‘डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ आणि विश्‍व शांती केंद्र (आळंदी)पुणेतर्फे 9वा ‘तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार 2017’  एल्डर डी. टॉड ख्रिस्तोफरसन यांना प्रदान करताना डावीकडून प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, डॉ.मायकेल नोबेल, एल्डर डी. टॉड ख्रिस्तोफरसन, मिसेस ख्रिस्तोफरसन, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रा.राहुल विश्‍वनाथ कराड व डॉ. मॅथ्यू हॉलंड.

पंढरपूर Live 14 August 2017


 पुणे, दि. 14 ऑगस्ट  :  “ धर्म ही जशी प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक बांधिलकी आहे, अगदी त्याचप्रमाणे ती समाजिक बांधिलकी देखिल आहे. आज जगात शांतीची नितांत गरज आहे. मात्र ही शांती केवळ वैयक्तिक पातळीवरची नसून ती सामूहिक स्वरूपात देखील प्रत्येक व्यक्तीचे उद्दिष्ट बनली पाहिजे.” असे प्रतिपादन अमेरिकेतील चर्च ऑफ जीझस ख्राइस्ट लॅटर डे सेंट्सचे प्रमुख मार्गदर्शक ‘एल्डर डी टॉड ख्रिस्तोफरसन’ यांनी केले. 
विश्‍वशांती केंद्र, (आळंदी) आणि डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे2017 सालचा एक अत्यंत महत्त्वाचा व  नोबेल  शांतता पारितोषिकाच्या धर्तीवर दिला जाणारा ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर जागतिक शांतता पुरस्कार-2017’  अमेरिकेतील येथील मॉर्मन कम्युनिटीचे मेंबर ऑफ द कोरम ऑफ ट्वेल्व्ह अ‍ॅपॉस्टल्स, व अमेरिकेतील सॉल्ट लेक सिटी येथील द चर्च ऑफ जीझस ख्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स, एल्डर डी टॉड ख्रिस्तोफरसन यांना  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड कॅम्पस, पुणे येथे हा पुरस्कार प्रदान समारंभ प्रदान करण्यात आला. या प्रसंगी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. 
  तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर माऊलीची सुवर्णजडित मूर्ती, माऊलींची प्रतिमा असलेले सुवर्णपदक,  सन्मानपत्र, शाल व रु. 5,25,000/- (सव्वापाच लक्ष  रूपये) असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 
 याप्रसंगी अमेरिकेतील नोबेल चॅरिटेबल ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ.मायकेल नोबेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे हे होते. 
यावेळी डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी डब्ल्यूपीयू चे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, श्री. फादर फंक, एल्डर रॉबर्ट विल्यम्स, श्री. मॅथ्यू हॉलंड, माईर्स एमआयटीचे सचिव प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. चंद्रकांत पांडव, प्रा. स्वाती कराड- चाटे, श्री. नानिक रुपानी  आदी मान्यवर उपस्थित होते.  
   एल्डर डी टॉड ख्रिस्तोफरसन म्हणाले, “आज चर्च सुद्धा इथल्या वैविध्यपूर्ण आणि तरीही एकसंध असणार्‍या विश्‍वासाशी एकरूप झाला आहे. अब्जावधी श्रद्धावानांसाठी आपण कोण आहोत अणि आपण कसे जगत असतो हे माहीत नसते. परंतु सर्व धर्मांच्या लोकांसाठी शांती आणि समाधान स्थापित करण्याच्या हेतूने धर्म, देश व समाजाला देखील या विश्‍वासाचा लाभ होतो. राष्ट्रीय समृद्धीवर धर्माचा मोठा प्रभाव पडतो. सर्व प्रकारचे लोक खर्‍या धार्मिक लोकांवर जास्त विश्‍वास ठेवतात.”
   डॉ. मायकेल नोबेल म्हणाले, “शांततेमध्ये नोबेल पारितोषिक हे सहसा शांततेच्या प्रसारासाठी जगभर एक गमक मानले जाते. पण त्या शिवाय इतरही प्रतिष्ठीत पूरस्कार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हा विश्‍व शांती पूरस्कार आहे. शांततेसाठी दिला जाणारा हा पुरस्कार भारतातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो.”
बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, “ आज ज्या व्यक्तीस हा सन्मान्य पुरस्कार दिला जात आहे, त्या व्यक्तीमध्येच मोठेपणा व नम्रपणा आहे. ज्या संताच्या नावाने हा पुरस्कार दिला गेला आहे. त्यांनी निर्मिलेले पसायदान ही अशी एकमेव प्रार्थना आहे की ती जर इतर कोणत्याही धर्म चिन्हाच्या खाली लावली गेली तर ती त्याच धर्माची प्रतिनिधी असेल. हेच या पसायदानाचे खरे सौंदर्य आहे.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “ एल्डर डी. टॉड ख्रिस्तोफरसन यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाच्या सेवेला समर्पित केले आहे. आज आम्ही सगळे जण जगात शांतता नांदावी आणि संस्कृतीचे रक्षण व्हावे या कारणासाठी एकत्र आलो आहोत. ही एक लहान सुरुवात आहे. आमच्या संस्थेने स्वामी विवेकानंदाच्या वचनांचे अनुसरण केले आहे.”
प्रास्ताविकपर भाषणात प्रा. राहुल वि. कराड यांनी पुरस्काराची माहिती दिली. 
सूत्रसंचालन प्रा. गौतम बापट यांनी केले. आभार प्रा. स्वाती कराड- चाटे यांनी मानले. 
           
                                                                                                                                      जनसंपर्क  विभाग,
      माईर्स एमआयटी, पुणे.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




Post a Comment

0 Comments