सोलापूर क्राईम रिपोर्ट.. डाॅक्टरने पत्नीचा खून करून प्रेयसीच्या घरात पुरला तिचा मृतदेह..! बघा काय आहे खळबळजनक घटना..!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
  • पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

सोलापूर क्राईम रिपोर्ट.. डाॅक्टरने पत्नीचा खून करून प्रेयसीच्या घरात पुरला तिचा मृतदेह..! बघा काय आहे खळबळजनक घटना..!

पंढरपूर Live 17  August 2017


नवीन विडी घरकुल येथील विनोदा संदूपटला हिच्या घरचे अंगण खोदून तीन दिवसांपूर्वी पुरलेला मृतदेह काढण्यात आला.

सोलापूर- प्रेयसीच्या प्रेमात अाकंठ बुडालेल्या नरहरी श्रीमल या “आरएमपी’ डाॅक्टरने पत्नी प्रवलिका श्रीमल यांचा गळा आवळून खून केला. यानंतर प्रेयसीसह इतर दोघींच्या मदतीने मृतदेह प्रेयसीच्या घरातच पुरला. ही घटना सोमवारी उघडकीस अाली. वळसंग पोलिसांत गुन्हा दाखल झाला. अक्कलकोट न्यायालयाचेे न्यायाधीश एस. एन. गवळी यांनी चौघांना २२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

नरहरी रामदास श्रीमल (रा. लक्ष्मीनारायण टॉकीज सोलापूर), विनोदा नागनाथ संदुपटला, महादेवी बसवराज होनराव अंबूबाई भीमराव कणकी (रा. विडी घरकुल) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हा कसा घडला? इतर कोणाचा सहभाग आहे का? प्लास्टिक पीप कुठे आहे? वाहन कोणते, चालक कोण? वगैरे माहिती घेण्यासाठी सरकार पक्षाचे एस. डी. टोणपे यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. आरोपीतर्फे अॅड. एस . जी. वंगे यांनी काम पाहिले.

आरोपीने मुलांचा विचारही केला नाही

प्रवलिकायांना तीन लहान मुले आहेत. तरीही नरहरीने हे टोकाचे पाऊल उचलले. अापल्या मुलांचे पुढे काय होणार? याचाही विचार केला नाही. उलट १२ अाॅगस्ट रोजी त्याने पत्नी गायब असल्याची तक्रार दिली. पत्नीच्या भावांना शोधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते.




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



Post a Comment

0 Comments