स्वेरीमुळे ग्रामीण भागात देखील तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास होत आहे. -भारतीय अणुउर्जा आयोगाचे सचिव डॉ. अरुण श्रीवास्तव

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 23 August 2017 











स्वेरीत अणु उर्जा विभाग आऊटरिच सेंटरचे उदघाटन
पंढरपूर-‘आपल्या भारतात स्वेरी प्रमाणेच इतर लहान मोठ्या औद्योगिक केंद्र स्थापीत झाल्यास भारताला भविष्यात कोणत्याही कारणाने दुसऱ्या देशाची मदत घ्यावी लागणार नाही.आपल्या घरातच सर्व सुविधा व्हाव्यात यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी व जनतेनी एकत्र येवून नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकरांनी भारतात सर्व प्रथम आपल्या भागात बार्कच्या माध्यमातून  संशोधनाचे केंद्र स्थापित केले असून याला शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आम्हा संशोधकाना एक नवी उर्जा मिळत आहे. नवीन तंत्रज्ञान अंगीकारल्यामुळे रोज नवनवीन संशोधन निर्माण होत आहे आणि याच संशोधनामुळे ग्रामीण भागात कसदार पिक येत आहे.’ असे प्रतिपादन भारतीय अणुउर्जा आयोगाचे सचिव डॉ. अरुण श्रीवास्तव यांनी केले.
           भाभा अणुसंशोधन केंद्राअंतर्गत असलेल्या गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये अणु उर्जा विभाग आऊटरिच सेंटरचे उदघाटन झाले. याप्रसंगी भारतीय अणुउर्जा आयोगाचे सचिव डॉ. अरुण श्रीवास्तव उपस्थित शेतकरी व विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती देत होते. सर्वांचे स्वागत करून स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी प्रास्तविकात जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काकोडकर यांनी स्वेरीत संशोधन केंद्र स्थापन केल्यापासून संशोधन केंद्राची वाटचाल व झालेली प्रगती, याला शेतकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद याचा आढावा सादर करून ‘शेतकरी आणि ग्रामीण भागातील सामान्य नागरिक यांच्यासाठी संशोधनाचे स्वेरीचे कार्य अविरत सुरू राहील.’ असे सांगितले. पुढे बोलताना आयोगाचे सचिव डॉ. श्रीवास्तव म्हणाले की, ‘स्वेरीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना ज्या प्रमाणे तंत्र शिक्षणाची आवड निर्माण केली. ते पाहून बार्कने याठिकाणी संशोधन केद्र स्थापन करून शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील जनतेला एक प्रकारे नवसंजीवनी निर्माण करून दिली आहे याचा फायदा घ्या. यासाठी उच्च स्वप्न पाहून ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा. कार्यक्षमता वाढवून विकासाची गती वाढवा. ’असे सांगून स्वेरीने याठिकाणी शेतकरी व विद्यार्थी यांच्या प्रगतीसाठी घेत असलेल्या अथक परिश्रमाचे कौतुक केले. सौ. संगीता श्रीवास्तव म्हणाल्या की, ‘हे तंत्रज्ञान ग्रामीण भागात खोलवर रुजविणे गरजेचे असून नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार केल्यास ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी विकासाच्या दिशेने झेप घेईल.’ यावेळी शास्त्रज्ञ डॉ. अजित पाटणकर यांनी देखील आपल्या मनोगतातून शास्त्रज्ञ डॉ काकोडकर यांनी मांडलेल्या सिलेजची संकल्पना सांगून ग्रामीण भागातील जनतेची प्रगती होत असल्याचे सांगितले. यानंतर सचिव डॉ. श्रीवास्तव यांनी संशोधनाच्या फूड विभाग, जलशुद्धीकरण निर्मिती, टिशू कल्चर, सौर वाळवणी यंत्र, माती परीक्षण,  बी बियाणे प्रयोगशाळा आदी विभागांना भेटी देवून सविस्तर प्रगती जाणून घेतली. आकृती प्रकल्पाच्या प्रमुख सौ. स्मिता मुळे यांनी ‘आकृती’च्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या शेतकरी व पंढरपूर तालुक्यातील पाचही गावात होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या प्रसार व प्रचाराबाबत तसेच वाय-फायच्या माध्यमातून जोडलेल्या पाचही शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीचा आढावा सादर केला. यानंतर शेतकरी व विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले याला डॉ. श्रीवास्तव यांनी समाधानकारक उत्तरे दिली. त्यानंतर अनवली, सरकोली व आंबे या भागात प्रत्यक्ष जावून तेथील शेतकऱ्यांची भेट घेवून सुसंवाद साधून भाभा अणुसंशोधन केंद्रांतर्गत देण्यात आलेल्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. याचबरोबर खर्डीमध्ये जावून तेथील विद्यार्थ्यांशी व तेथूनच डीएई आऊटरिच सेंटर अंतर्गत जोडणी केलेल्या अनवलीमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या साह्याने संवाद साधला.
          यावेळी आंबेचे सरपंच कोळी, स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष तानाजी बागल, आर्किटेक्ट यादगिरी कोंडा, प्रा. सुभाष भोसले शिवाजी आसबे, संभाजीराजे शिंदे, सचिन पाटील रणजीत बागल,बालाजी चव्हाण, संस्थेचे माजी अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, आर.एच.आर.डी.एफचे प्रमुख गजेंद्र कुलकर्णी, परमेश्वर माळी,स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य,उपप्राचार्य,अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व शेतकरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी तर आभार स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी मानले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Post a Comment

0 Comments