हिंसा आणि उन्माद म्हणजे धर्म नव्हे, रामदेव बाबांचा ‘डेरा सच्चा सौदा’ समर्थकांवर निशाणा

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क 

मुख्य संपादकभगवान वानखेडे  
Whatsup- 8308838111  Mobile-  8552823399

mail- livepandharpur@gmail.com
web - http://www.pandharpurlive.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 26 August 2017 


    योगगुरु बाबा रामदेव यांनी ‘डेरा सच्चा सौदा’च्या समर्थकांवर निशाणा साधला. धर्म हेच जीवनातील श्रेष्ठ आचरण आहे. हिंसा आणि उन्माद हा काही धर्म नाही असे ट्विट बाबा रामदेव यांनी केले आहे. या ट्विटमधून बाबा रामदेव यांनी अप्रत्यक्षपणे ‘डेरा सच्चा सौदा’ समर्थकांवर निशाणा साधला.
    ‘डेरा सच्चा सौदा’चे गुरमित राम रहिम सिंग यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर समर्थकांनी रस्त्यावर उतरून जाळपोळ आणि तोडफोड केली. या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांनी ट्विटरवरुन भाष्य केले. शुक्रवारी बाबा रामदेव यांनी हिंसाचाराचा निषेध दर्शवला होता. तर शनिवारीदेखील त्यांनी अप्रत्यक्षपणे डेरा सच्चा सौदा समर्थकांवर निशाणा साधला. जीवनात धर्म हेच श्रेष्ठ आचरण आहे, हिंसा, उन्माद, अंधश्रद्धा हे धर्म नव्हे असे त्यांनी सांगितले. धर्मात सर्वस्व काय आहे हे जाणून घ्या आणि त्या मार्गावर चालत राहा. जे तुम्हाला आवडणार नाही, तसे वर्तन करु नका असेही त्यांनी म्हटले आहे.


    बाबा रामदेव यांच्या ट्विटचे अनेकांनी स्वागत केले. पण काहींनी रामदेव बाबा यांच्यावरही टीका केली. बाबा राम रहिमनंतर आता पुढचा नंबर तुमचा असे एकाने म्हटले आहे. तर व्यापार करणे गैर नाही. पण धर्माचा आणि धर्माच्या नावावर व्यापार करणे गैर आहे. एखाद्या पुरुषाने महिलांचे कपडे परिधान करुन पळ काढणे गैर आहे असा टोला एक यूजरने लगावला आहे.

    शुक्रवारी बाबा राम रहिम यांना बलात्कार आणि लैंगिक शोषण या दोन प्रकरणांमध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. १५ वर्षांपूर्वी सिरसामधील आश्रमातील दोन महिला साध्वींवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Post a Comment

    0 Comments