मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे पण....!- ना.रामदास आठवले

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 18  August 2017 

पंढरपूर :- मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे! याला आमची व आमच्या पक्षाची करायम सहमती होती व पुढेही असेल पण... मराठा समाजासह, जाट, पटेल आदी समाजाला आरक्षण देण्यासाठी घटनेत तशी कायदेशीर तरतुद करण्याची करण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी मांडले.  घटनेत तरतुद केल्याशिवाय मराठा आरक्षण मिळणार नाही. याबाबत आपण स्वत: केंद्र सरकारला माहिती देण्याचा प्रयत्न करत करत असल्याची माहिती त्यांनी दिली. पंढरपूर नगरपालिकेने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी ते आले असता पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.   

 मुंबई उच्च न्यायालयाने मागासवर्गीयांचे नोकरी मधील पदोन्नती मधील आरक्षण रद्द केले असले तरी लवकरच केंद्र सरकार ‘मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाचा कायदा’ करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भाजपबद्द्ल दलित, मुस्लिम समाजात गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. संविधान आणि आरक्षण हे कधीच रद्द केले जाणार नाही. सोलापूर विद्यापीठाला राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यास आरपीआयचा पाठींबा आहे. याबाबतची मागणी आपण लवकरच राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे ते म्हणाले. 

केंद्र सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करणार असुन पुढील दहा वर्ष केंद्र आणि राज्यात भाजपा आघाडीची सत्ता कायम राहणार आहे. काँग्रेसचे नेतृत्व दुबळे असल्याने त्यांना सत्ता मिळु शकणार नसल्याचेही ते बोलले. काँग्रेस नेते नारायण राणे यांना भाजपा मध्ये येण्याचे निमंत्रण त्यांनी दिले आहे. 

सरकारला कोणताही धोका नाही. जरी शिवसेनेने पाठिंबा काढला तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक आमदार आपल्या संपर्कात आहेत; त्यांच्या मदतीने आम्ही पाच वर्ष पुर्ण करु असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. 


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Post a Comment

0 Comments