11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 22 August 2017 


    बीड – पावसाच्या उघडीपीमुळे पोळा सणावर संकट ओढावले होते. मात्र, गेल्या दोन दिवसाच्या विक्रमी पावसामुळे चित्र पालटले असून सोमवारी बैलपोळा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलजोडीची शेतकरऱ्यानी मोठ्या थाटात मिरवणूक काढून परंपरेनुसार हा सण साजरा करण्यात आला.
    गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे खरीपातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून पोळा या सणावरही संकट ओढावले होते. पोळ्या दिवशी बैल धुण्यासाठीही पाणी उपलब्ध नसल्याचे वास्तव होते. त्यामुळे सणाच्या तोंडावरही बाजारपेठेत कमालीची शांतता पाहवयास मिळत होती. शनिवारी दुपारपासून पावसाने सबंध जिल्ह्यात हजेरी लावली असून समारे 35 मंडळात अतिवृष्टी होती. एका रात्रीतच चित्र पालटल्याने रविवारच्या आठवडी बाजारात पोळ्याच्या साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यानी गर्दी केली होती. सोमवारी सायंकाळी बैलजोडीची मिरवणूक काढून परंपरेनुसार सण उत्साहात पार पडला. पावसाच्या पुनरागमनामुळे रबी हंगामासाठीही वातावरण पोषक झाले आहे.


    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111