चोरट्यांच्या मनात देवाची सुध्दा भीती उरली नाही... पंढरपूर तालुक्यातील जैन मंदिरातील चांदीच्या सिंहासनासह 80 हजाराचा मुद्देमाल चोरला..!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


पंढरपूर Live 22 August 2017 

पंढरपूर_कुर्डुवाडी रोड वर मार्गावरील त्रिलोकतिर्थ  मंदिरात मंगळवार दि. २२ ऑगस्ट च्या पहाटे २ ते ४ वाजण्याच्या सुमारास चोरी झाली असून चोरट्यानीं मंदिरातील मुर्त्या व चांदीचे सिंहासनासह सुमारे 80 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरला आहे.

पंढरपूर -कुर्डूवाडी मार्गावर पंढरपूरपासून जवळच  जैन धर्मियांचे त्रिलोकतिर्थ हे जैन मंदिर आहे . या मंदिरातीव मुर्तीवरचे चांदीचे छत्र , १ मोठी आणि ४ लहान मुर्त्या , चांदीचे सिंहासन असा सुमारे  ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे . मंगळवारी पहाटे २ ते ४ च्या दरम्यान चोरट्यानीं मंदिराच्या मागच्या बाजुने दोन कुलूप तोडुन मंदिरात प्रवेश करून देवालाच लुटल्याने चोरट्यांच्या मनात देवाची सुध्दा भीती उरली नसल्याचे दिसून येते.  
सदर चोरी प्रकरणी मंदिराचे व्यवस्थापक शैलेश कोठारी यांनी पंढरपूर तालुका पोलिसात तक्रात दाखल केली असून पुढील तपास तालुका पोलिस करीत आहेत .

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments