श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये ७१ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व 
Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


पंढरपूर Live 16  August 2017

पंढरपूरः-गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात भारताचा ७१ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डिप्लोमा पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचे प्राचार्य प्रा. एन.डी.मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
       भारतमाता प्रतिमा पूजनानंतर सुरवातील स्वप्ना सावंत, ऋशाली भोसले, दादासाहेब मस्के व अभिनव आनंद यांनी भारतातील राज्यघटनेपासूनसंरक्षण व्यवस्थासामाजिक परिस्थिती, आधुनिक भारत व इंडिया यातील फरक  तसेच महागाई व भ्रष्टाचार या विषयावर अत्यंत पोटतीडकिने विचार मांडून देशाने आपल्यासाठी काहीतरी करण्याऐवजी आपण देशासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे सांगणारी विदारक सत्य असणारी भाषणे दिली तर ईशा माने, प्रियांका माने,पायल चव्हाण व आदींनी ए वतन, ए वतन तुझको ...... तर ऋषिकेश वाघमारे यांनी हुबेहूब महेंद्र कपूर यांच्या आवाजात ‘हे प्रीत जहाकी रीत सदा ....’ अत्यंत सुरेल देशभक्तीपर गायलेल्या गीताने सारा परिसर देशभक्तीमय झाला. राम काळे यांनी पेटीवादन तर शुभम परदेशी यांनी तबला वादन करुन ‘झंडा उंचा रहे हमारा ...’ राष्ट्रगीताला दिलेली साथ लक्षवेधी ठरली. अधून मधून भारत माता की जय’ या घोषणांनी आसमंत दणाणत होता.

 स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्वेरीयनया त्रेमासिकाचे तसेच चारही महाविद्यालयाच्या विविध विभागांच्या अहवालाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘स्वेरीयनचे संपादक डॉ.प्रशांत पवार म्हणाले,‘ न्यायव्यवस्थारस्तेशेतकरी समस्या हे महत्वपूर्ण विषय आहेत. तिथेखेळकला व संशोधन या जीवन दर्जा उंचावणाऱ्या गोष्टी हौसेच्या मानल्या जातात परंतू आपले महाविद्यालय या मुलभूत समस्यांवर संशोधन करीत असल्याने हे संशोधन उपयोगाचे व गरजेचे ठरत आहे’ डिप्लोमाचे प्राचार्य प्रा मिसाळ यांनी देखील स्वातंत्र्याची महती सांगणाऱ्या भाषणातून समाजातील घडामोडींवर प्रकास टाकला. यावेळी कोरके पाटील, संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगेबी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.रविंद्र कुलकर्णीडी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवेविद्यार्थी अधिष्ठाता प्रा.एस.आर.गवळी,सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.एस.एम.शिंदेप्रा.यशपाल खेडकरचारही महाविद्यालयाचे अधिष्ठाता,विभाग प्रमुख,प्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह चारही महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन विजया गुंड,अरुणा पुजारी व ऋशभ जाधव यांनी खास शैलीत करून आभार मानले .

छायाचित्रः
.भारताचा ७१ वा स्वातंत्र्यदिन निमित्त श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात डिप्लोमा पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचे प्राचार्य प्रा. एन.डी.मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सोबत डावीकडून संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे व इतर प्राध्यापक वर्ग.
२. ध्वजारोहन त्यावेळचे विहंगम दृष्य.
.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्वेरीयन’ या त्रेमासिकाचे प्रकाशन करण्यात आले.याप्रसंगी डावीकडून संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे प्रमुख डॉ.प्रशांत पवार, डिप्लोमा पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचे


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



Post a Comment

0 Comments