म्हैसाळ उपसा सिंचन योजने अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील कामांविषयी आमदार भारत भालके यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
  • पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


पंढरपूर Live 17  August 2017 

पंढरपूर ः दि.16 - आज बुधवार दि.16.08.2017 रोजी पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह येथे म्हैसाळ उपसा सिंचन योजने अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील कामांबाबत संबंधित अधिकार्‍यांची बैठक पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांचे उपस्थितीत संपन्न झाली.

सदर बैठकीत जत मुख्य कालव्यावरील बांधकामांची सद्यःस्थिती व नियोजन, मंगळवेढा वितरिका क्र.1 च्या कामाची सद्यःस्थिती व नियोजन, मंगळवेढा वितरिका क्र.2 च्या कामाची सद्यःस्थिती व नियोजन तसेच प्रकल्पाच्या कामासाठी कराव्या लागणार्‍या भूसंपादनामध्ये असणार्‍या  अडी-अडचणी व मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजने अंतर्गत चालू असलेल्या विकास कामांचा आढावा घेऊन सदरची कामे त्वरीत पूर्ण करणेसाठी संबंधित अधिकार्‍यांना आमदार श्री भारत भालके यांनी योग्य त्या सूचना केल्या.
सदर बैठकीस मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी तसेच अधिक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता व संबंधित क्षेत्रीय अधिकारी वर्ग उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




Post a Comment

0 Comments