पावसाने जिरेवाडी परिसरातील शेतकरी सुखावले

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 20 August 2017 

    बीड: मागील दीड महिन्यापासून दंडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळपासून सुरूवात केल्याने जिरेवाडी परिसरातील शेतकरी राजा सुखावला आहे. जिल्हयात सर्वदूर संततधार पाऊस झाला. रविवारी सकाळ पर्यंत ७५३.१४ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. (चोवीस तासात) सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालात म्हटले आहे.
    दीड महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र आनंदी वातावरण झाले आहे. शनिवारी सायंकाळ पासून सुरू झालेला पाऊस जिल्ह्यात सर्वदूर झाला आहे.
    चोवीस तासात ७५३.१४ मि.मी. पाऊस
    मागील चोवीस तासात ७५३.१४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे म्हणजे ६५ मि. मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. यामध्ये बीड- ७४.८२, पाटोदा ९७.५०, गेवराई ६९.२०, शिरूर कासार ८२.००, अंबाजोगाई ७५.००, केज ६५.८६ अशी नोंद आहे. याशिवाय आष्टी, ६२.८६, वडवणी ५९.००, माजलगाव ५१.५०, धारूर ५७.००, परळी ५८.४० अशी मागील चोवीस तासातील पावसाची नोंद आहे. एकूण सरासरी ६८.५० मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. रविवारी पहाटेपासूनच रिमझिम सरू आहे.
    रस्ते जलमय...
    बीड जिल्ह्यातील जिरेवाडी,आनंदवाडी ,रामनगर ,बहीरवाडी,कुमशी परिसरातील शेतकरी पावसाने सुखावले आहेत

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Post a Comment

    0 Comments