पंढरपुरातील देवी- 3 (पद्मावतीची टेकडी)

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 24 september  2017 

 पद्मावती देवीचा तांदळा


 मंदिर आणि समोरचा पूल



पद्मावतीची बाग

पंढरपूरच्या नैरुत्त्य दिशेला छोट्याश्या डोंगरासारखी वाटणारी हि टेकडी होती . बाहेरून दगड मातीचा ढीग दिसत असला तरी आतल्या बाजूने विस्तीर्ण भव्य असे एखाद्या स्टेडीयम सारखे पाय-या पाय-या चे दगडी बांधकाम दिसायचे .याला पद्मावतीचे तळे असेही म्हणतात . यात आता पाणी नाही आजही हे विस्तृत भव्य चौरस बांधकाम तसेच आहे . आत नगरपालिकेने सुंदर बाग बनवली आहे मात्र बाहेरील बाजूने बनवलेल्या शॉपिंग सेंटर मुळे टेकडी मात्र नष्ट झाली . आमच्या भागात डोंगर वगैरे प्रकार कधी बघायला मिळत नसल्याने हि टेकडी हाच आमच्यासाठी मोठ्ठा डोंगर होता . डोंगरावर जायची लहर आली कि या टेकडीवर जायचे . या टेकडीच्या आतील बाजूस पद्मावती देवीचे मंदिर होते . म्हणजे अजूनही आहे . या चौरसाकार तळ्याच्या मध्यभागी पद्मावती देवीचे हे मंदिर आहे . या मंदिरा पर्यंत जाण्यासाठी लहानसा दगडी पूल आहे . मंदिरात पद्मावती देवीचा तांदळा आहे .

माझी आदर्श प्राथमिक शाळा ही या पद्मावतीच्या टेकडी पासून हाकेच्या अंतरावर . त्यामुळे कधी या दिशेने शाळेत आलो किंवा घरी निघालो कि ही टेकडी दिसायची . शाळेच्या वयात मला डोंगर म्हणतात तो हाच असे वाटायचे . नंतरच्या आयुष्यात बरेच उंच डोंगर चढून गेलो पण पद्मावतीच्या या टेकडीचे थ्रिल काही औरच होते .
एकदा पहिली दुसरीत असताना शाळेत मी काही तरी खोडी केली आणि बाईंनी मला न्यायला आलेल्या माझ्या आज्जीला ते सांगितले . आज्जीचा पारा चढला " चल तुला त्या डोंगरावर सोडते " असे म्हणत तिने मला ओढत त्या टेकडीवर आणले . त्या वेळी माझ्या दृष्टीने आतली तळ्याची खोली खूपच होती त्यामुळे मी घाबरून गेलो त्यात पुन्हा या डोंगरावर देवी राहते असे मी ऐकले होते . आता देवी म्हणजे वाघ आलाच . ही आज्जी बया आपल्याला या डोंगरावर सोडून गेली आणि वाघोबा आले तर काय ? आणि नेमकी देवी त्याच्या वर नसली तर त्याला कोण कंट्रोल करणार ? या कल्पनेने मला घाम फुटला .मी आज्जीच्या पायावर लोळन घेत "पुन्हा असे करणार नाही . शाळेत नीट वागेन " अशी गयावया केली पण आज्जी ऐकेना . " तुला इथेच सोडून जाणार " म्हणाली . संध्याकाळची वेळ असल्याने अंधार पडत चाललेला होता .माझ्या नशिबाने नेमकी तळ्याच्या मैदानात काही तरुण मुले वौलीबॉल खेळत होती .त्यातला एक तरुण धावत आला आणि त्याने माझ्या आज्जीची समजूत घातली . देवीसमोर अंगात आलेल्या स्त्रीला आजूबाजूचे सगळे "शांत व्हा आई " अशी विनवणी करतात आणि मग ती स्त्री शांत होते तसा प्रकार झाला आणि आज्जी शांत झाली .
तो तरुण नंतर बरेचदा रस्त्यात भेटला कि ती आठवण करून द्यायचा आणि विचारायचा " आता नाही ना खोड्या करत शाळेत ? " .
पद्मावतीच्या त्या भागातून जाताना मला ही आठवण कधी आली की मी स्वतःशीच हसतो आणि मी एकटाच का हसतोय ? म्हणून लोक माझ्याकडे बघून हसतात . हसो बिचारे .... ......जगदंब !

-श्याम सावजी, पंढरपूर


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments