कॅनडाच्या मदतीने पंढरपूर बनणार ’स्मार्ट शहर' कॅनडा सरकारने तयार केला दोन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 23 september  2017 

कॅनडाच्या मदतीने पंढरपूर बनणार ’स्मार्ट शहर’

*कॅनेडियन दुतावासाचे प्रतिनिधी ३ ऑक्टोबरला देणार पंढरपूरला भेट*

*भारत-कॅनडा मैत्रीला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कॅनडाकडून भारताला मिळणार गिफ्ट*

*कॅनडा सरकारने तयार केला दोन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा*

*श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांची माहिती* 

भारत-कॅनडा मैत्रीचा करार झाला असून त्यांनी स्वत:हून पंढरपूरच्या विकासासाठी साहाय्य करण्याची तयारी दर्शविली असलयबाबतचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीदिवशी पंढरपूर येथे केले होते.

याच अनुषंगाने शुक्रवारी (ता. २३) मुंबई येथे कॅनेडियन दुतावासाच्या प्रतिनिधींसमवेत एक बैठक पार पडली. या बैठकीला श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, राज्याचे मुख्य अवर सचिव प्रवीण परदेशी, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत पंढरपूर शहराच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार शहरातील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदरि परिसर, शहरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, चंद्रभागेचा विकास, सांडपाण्याची व्यवस्था यासह संपूर्ण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्यास कॅनेडियन दुतावासाच्या प्रतिनिधींनी तत्वत: मंजुरी दिली असून, शहराची पाहणी करण्यासाठी प्रतिनिधींचे मंडळ ३ ऑक्टोबर रोजी पंढरपूरला भेट देणार आहे.

पंढरपूर शहराचा चेहरामोहरा बदलून, पंढरपूरला स्मार्ट शहर बनविण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कॅनडा सरकारच्या या प्रकल्पामुळे पंढरपूर हे देशात लवकरच स्मार्ट शहर म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला आहे.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments