- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 28 september 2017
पंढरपूर : कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांच्या विचारातून आणि कार्यातून साकारलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सामाजिक शिक्षणातून जीवन घडविण्याचे विचार विद्यार्थ्यांना प्राप्त होत असल्यानेच आज रयतचे विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये चमकताना दिसुन येत आहेत. असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आबासाहेब देशमुख यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयामध्ये कर्मवीर जयंतीच्यानिमीत्ताने आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी देशमुख अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमासाठी मध्य विभागाचे सहसचिव व्ही. एम. महाडीक,शिवाजीभाऊ पाटील, जनरल बॉडी सदस्य मारूतीआबा पाटील, बाळासाहेब पाटील, संचालक दिनकर कदम, माजी पं. स.सदस्य महेश कदम, माजी संचालक विलास भोसले, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, माजी कृषी अधिकारी मधूकर गुंजाळ, उपसरपंच गणेश भोसले, विलासआप्पा भोसले, विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जून भोसले, तंटामुक्तीचे अध्यक्ष जनक भोलसे, माधव कारंडे, विठ्ठल गोडसे, सोलनकर, गुलाबराव माने, माणिक चौधरी, अरूण भोसले, सगुना शेडगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस थोर देणगीदार गोविंद निंबाळकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला.
पुढे बोलताना देशमुख यांनी कोणत्याही संकटावर मात करीत विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी झटणारा रयत सेवक लाखमोलाचा असून अशा उत्कृष्ट रयत सेवकाचाही गौरव झाला पाहीजे. असे सांगितले तर यावेळी मारूतीआबा पाटील आणि व्ही.एम.महाडीक यांनी आपल्या भाषणातून रयत शिक्षण संस्थेच्या संस्कारक्षम शैक्षणिक कार्याचा गौरव केला.
तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य सखाराम बागल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


0 Comments