पंढरीतील ‘नवदुर्गा’ सार्वजनिक नवरात्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 22 september  2017 

पंढरपूर (प्रतिनिधी):-नवदुर्गा सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ, क्रांती चौक, कोळी गल्ली, पंढरपूर यांचे वतीने दि. 21 सप्टेंबर 2017 ते दि. 6 सप्टेंबर 2017 या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये रक्तदान, नेत्रदान, अवयवदान, लहान मुलांची मोफत आरोग्य तपासणी, रांगोळी स्पर्धा, महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, देवीच्या गाण्यांच्या गायन स्पर्धा, फराळाचे वाटप, दांडीया (गरबा) कार्यक्रम, कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुध वाटप व महाप्रसाद आदींचा समावेश आहे. मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष लक्ष्मण (भाऊ) शिरसट यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य नागरिक व समाजहित डोळ्यासमोर ठेवून जनहितास्तव विविध उपक्रम व मनोरंजनात्मक कार्यक्रम आमचे मंडळ राबवत असते. अशी माहिती नगरसेवक विक्रम शिरसट यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. मंडळाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  व मंडळाचे अध्यक्ष प्रदीप परचंडे, पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
गुरुवार दि. 29 सप्टेंबर रोजी मंडळाचे वतीने अंबाबाई मंदिर येथे श्री देवीची महापुजा पहाटे 5 वाजता झाली. सायंकाळी 6 वाजता क्रांती चौक येथे घटस्थापना करण्यात आली. दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सरकारी दवाखाना कोळी गल्ली येथे रक्तदान, नेत्रदान, अवयवदान नोंदणीचा उपक्रम राबविण्यात येणार असून यावेळी डॉ.अनिल जोशी, डॉ.शितल शहा, डॉ.सुरज पाचकवडे व डॉ.मुकुंद कोंडुभैरी आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. दि. 23 सप्टेंबर रोजी ज्ञानेश्‍वर सेवा मंडळ, कोळी गल्ली येथे सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत 8 वर्षाच्या आतील मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. यावेळी युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेशराव परिचारक व डॉ. मुकूंद कोंडुभैरी, डॉ. केचे आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. दि. 24 सप्टेंबर रोजी कोळी गल्ली, क्रांती चौक येथे सायंकाळी 6 ते 9 या वेळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी मोबाईल क्र. 9850182518, 9822820888 या क्रमांकावर संपर्क साधावा. दि. 25 सप्टेंबर रोजी कोळी गल्ली, क्रांतीचौक येथे सायंकाळी 6 वाजता महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दि. 26 सप्टेंबर रोजी रात्रौ 8 ते 10:30 पर्यंत देवीच्या गाण्याचा कार्यक्रम (गायन स्पर्धा) चे आयोजन केले आहे. 27 सप्टेंबर रोजी नवदुर्गा उत्सव मंडळाच्या श्रीदेवीच्या महाआरतीचे आयोजन सायंकाळी 7 वाजता केले आहे. यावेळी आमदार प्रशांतराव परिचारक व सौ. सीमाताई प्रशांत परिचारक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. दि. 28 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत अष्टमीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 29 सप्टेंबर रोजी कोळी गल्ली येथे सायंकाळी 8 वाजता दांडीया (गरबा) चे आयोजन केले आहे. दि. 5 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुध वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दि. 6 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या सर्व उपक्रमास व मनोरंजनात्मक कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप परचंडे यांनी केले आहे.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments