चिकमहुद येथील हागणदारीमुक्ती कार्यक्रमात प्रबोधनाचे काम जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 11 october  2017 


सोलापूर दि. 10 :-  स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सोलापूर जिल्हा हागणदारीमुक्त व्हावा यासाठी   सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथे  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी ग्रामस्थांमध्ये प्रबोधनाचे काम केले आहे व  यातून कोणाच्याही भावना दुखावणे हा हेतू नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज दिली.
            चिकमहुद  (ता. सांगोला) येथील कार्यक्रमात महिलांचा अवमान झाला याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात काही महिला पदाधिकारी निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या. याबाबत माहिती घेतली असता गाव हागणदारीमुक्त व्हावे यासाठी गावात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावच्या हागणदारी मुक्तीकरीता प्रबोधनाचे आवाहन केले होते. या आवाहनामध्ये वृध्द महिला व ग्रामस्थ सहभागी झाले होते. स्वच्छ भारत टिमच्या गटविकास अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांसमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या गावी 5 ऑक्टोबर 2017 रोजी मुक्काम केला व हागणदारीमुक्तीबाबत प्रबोधनाचे कार्यक्रम सादर केले. गाव हागणदारीमुक्त व्हावे हा मुख्य हेतूच ठेवून त्यांनी हे काम केले. या कार्यक्रमातून गावातील कोणत्याही महिलांचा अवमान  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी  केलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे.
दिनांक 5 ऑक्टोबर 2017 रोजी प्रशासकीय अधिकारी व गावकऱ्यांसमवेत गावात प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात हागणदारीचे महत्व डॉ. भारुड यांनी गावकऱ्यांना समजावून सांगितले व उपस्थित अधिकारी, कर्मचारी व गावकऱ्यांकडून हागणदारीमुक्तीबाबत शपथ घेतली. दिनांक 6 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी घरोघरी जावून लोकांमध्ये स्वच्छतेबाबत प्रबोधन केले  व शौचालय वापर करणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कारही केला. गावातील प्रबोधनाप्रसंगी ज्यांनी शौचालय बांधले नाहीत त्यांचे बचत गटातील महिला व पदाधिकारी यांच्या समवेत त्यांचे प्रबोधन केले व त्यांनी  शौचालय सत्वरतेने बांधण्याची हमी दिल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.  या प्रसंगाचे छायाचित्र प्रसारीत झाले. पण, या मागचा हेतू केवळ समाजप्रबोधन व स्वच्छता कार्यक्रमाची जनजागृती करणे हाच होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी गावात येऊन गेल्यानंतर केवळ तीन दिवसात गावात 100 पेक्षा अधिक शौचालये बांधून झाली आहेत. चिकमहुद येथे स्वच्छता विषयक जनजागृतीचा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात  संपन्न झाल्याचे समजते, असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments