पंढरीत टायरचे दुकान फोडून एक लाखाच्या मालाची चोरी... आरोपी गजाआड!


पंढरपूर Live च्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना व आमच्या हितचिंतक मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! ही दिपावली तुम्हा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व आरोग्यदायी व भरभराटीची जावो हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना..!
  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 15 October 2017

 


पंढरीत टायरचे दुकान फोडून एक लाखाच्या मालाची चोरी... आरोपी गजाआड!

पंढरपूर शहरातील एका टायरचे दुकान फोडून त्यातील एक लाखाहून अधिक रक्कमेच्या मालाची चोरी करणाऱ्या चोरटयांना पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर हकीकत अशी की, पंढरपूर टेंभुर्णी रोडवरील प्रमिला अॅटोमोबाईल्स या दुकानाचे पाठीमागे असलेल्या गोडाऊनचे छताचा पत्रा वाकवून दि.11 आॅक्टोबर चे रात्री 8 ते 12 आॅक्टोबर चे सकाळी 9 वाजणेच्या सुमारास ही चोरी झाली.

अज्ञात चोरट्यांनी या गोडाऊन मधील जे.के,. अपोलो व  एम. आर. एफ कंपनीचे टायर व आॅईलचे डबे असा एकुण 1 लाख 5 हजार 750 रूपये किंमतीचा माल चोरला होता.

या गुन्ह्याची नोंद  पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात झाली होती. तपास  पो.हे.काॅ. उबाळे यांचेकडे होता.

पंढरपूर शहर पोलिस गुन्हे प्रकटीकरण शाखेने या गुन्ह्यातील आरोपींना आज अटक केली आहे. या गुन्ह्यातील आरोपी धनाजी अशोक पवार, मोहन अनिल दिघे, सागर पांडुरंग मेटकरी,सर्व रा. सोनके, ता. पंढरपूर यांना  तातडीने जेरबंद करण्यात पोलिसांनी यश मिळविले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments