शिवशक्ती युवा मंच व भीमशक्ती आरोग्य समिती कडून लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबीर

पंढरपूर Live 21 October 2017


सामाजिक उपक्रमा अंतर्गत अनुलोम व शिवशक्ति युवा मंच व भीमशक्ति आरोग्य समिति यांच्या विद्यमाने संत पेठ शाळा नंबर 9 येथे लहान मुलांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात एकूण 150 पेक्षा जास्त बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात रक्तवाढीचे, जंतनाशक, सर्दी खोकला, वजन वाढिचे, ताप व त्वचारोग यांची औषधे व गोळ्या मोफत देण्यात आल्या. या शिबिरासाठी डॉ दिपक धोत्रे, डॉ. मेनगुदले, डॉ निंबालकर , डॉ कुलकर्णी या डॉक्टरणी या मुलांची मोफत आरोग्य तपासणी केली. 

2 बालके कुपोषित आढळून आली. त्यांचा उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत उपचार करण्यात येणार आहे. यात एकूण 150 पेक्षा जास्त मुलांची तपासणी करण्यात आली.यावेळी अनुलोम सोलापूर उपविभाग प्रमुख सुनिल पिसके पंढरपूर भाग जनसेवक पांडुरंग शिंदे भिमशक्ती मंडळाचे संस्थापक संतोष सर्वगोड.रामेश्वर कोरे.अपराजित सर्वगोड. धनंजय सर्वगोड.धर्मपाल जाधव.अरुण सर्वगोड.सुखदेव माने.भगवान यादव.गणेश शिंदे.राम खरात.राम सर्वगोड.देविदास बनसोडे.किशोर खिलारे.पै रसुल मुलाणी.सचिन भोरकडे.दत्तात्रय धोत्रे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंढरपूर Live च्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना व आमच्या हितचिंतक मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! ही दिपावली तुम्हा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व आरोग्यदायी व भरभराटीची जावो हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना..!
  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments