- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 12 October 2017
सोलापूर दि. 11 :- हस्तकला उद्योगाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपली उत्पादने अधिकाधिक
लोकापर्यंत पोहोचावित, असे आवाहन राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळाचे उपव्यवस्थापक पी. एल. सिंघल यांनी
आज येथे केले.
पंडीत दिनदयाळ उपाध्याय गरीब कल्याण वर्षाचे औचित्य साधून राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळ आणि
भारत सरकारच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयातर्फे आयोजित हस्तकला सहयोग शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते
बोलत होते. येथील पुर्व विभाग वाचनालयाच्या विणकर सभागृहात हा कार्यक्रम झाला.यावेळी प्रादेशिक वस्त्रोद्योग
कार्यालयाचे किशन पवार, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी राजेंद्र
दासरी, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सतीश घोडके, एनएचडीसी मुंबईचे डेप्युटी मॅनेजर पी.एल. सिंघल,
सुपरिटेंडट उपेंद्र व्यासपीठावर उपस्थित होते. या शिबीरात विणकरांना देण्यात येणा-या कर्जाबाबतची माहिती,
यार्न पासबुक, आधुनिक तंत्रज्ञान, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, विविध प्रदर्शने यांची माहिती देण्यात आली.
शिबीरात काही विणकरांना केंद्र शासनाच्या मार्जिन मनी आणि सहा टक्के व्याज दरावर कर्ज उपलब्ध करुन देण्यात
आले.
प्रारंभी भैरवमार्तंड कलापथकाने कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमात जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश
श्रीराम यांनी विणकर मुद्रा लोन विषयी माहिती सांगुन या योजनेचा आपल्या व्यवसायासाठी फायदा घेण्याचे
आवाहन केले. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय, सोलापूरच्यावतीने प्रश्नमंजुषा
कार्यक्रम घेण्यात आला. श्रीनिवास अनंतूल, व्यंकटेश मादगुंडी, राजेशम शादुल व सत्यनारायण वंगा विजेत्यांना
मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे



0 Comments