मला मारहाण वगैरे झालीच नाही..! मंदिर समिती महिला सुरक्षा कर्मचारी भगिणीने पंढरपूर लाईव्ह ला दिली माहिती..!

पंढरपूर लाईव्ह व सा. झंझावात च्या सर्व वाचक, हितचिंतक, जाहिरातदार बंधु-भगिणींना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! 
  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 5 October   2017 

मला मारहाण वगैरे झालीच नाही..! मंदिर समिती महिला सुरक्षा कर्मचारी भगिणीने पंढरपूर लाईव्ह ला दिली माहिती..!

पंढरपूर लाईव्ह:- आज पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या मंदिरातील गाभार्‍यात आपले कर्तव्य पार पाडणार्‍या सुरक्षा रक्षक कर्मचारी अलका पवार यांना एका भाविकाने धक्का दिल्याने त्या जखमी झाल्याची घटना घडली होती. परंतु या संदर्भात कोणत्याही गुन्हयाची नोंद शहर पोलिसांकडे झालेली नव्हती. या संदर्भात पंढरपूर लाईव्हने अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सदर महिलेनेच गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचे समजले. या महिला भगिणींच्या घरी जाऊन पंढरपूर लाईव्हने त्यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, आज मंदिरात मी ड्युटीवर असताना एका भाविकाचा धक्का मला लागला. त्यामुळे मंदिरातील गाभार्‍याच्या भिंतीला माझे डोके धडकल्याने माझ्या डोक्याला मार लागला होता. मेडीकल तपासणीनंतर सदर भाविकाच्या विरुध्द तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात मी गेले होते परंतु सदर भाविक वयोवृध्द असल्याने व नकळत लागलेल्या धक्क्याबाबत त्याने माझी माफी माागितल्यामुळे मी गुन्हा नोंदवला नाही. मला या भाविकाने जबरदस्तीने मारहाण केली नसल्याची माहिती या महिला सुरक्षा कर्मचारी भगिणीने पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली आहे. बघा वरील व्हिडीओ.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments