श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरातील महिला कर्मचार्‍यांची सुरक्षितता महत्वाची- नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 6 october  2017 
काल श्रीविठ्ठलाच्या गाभार्‍यात महिला सुरक्षा रक्षकासोबत एका भाविकाने केलेल्या उध्दट वागणुकीसंदर्भात खंत व्यक्त करत पंढरपूरच्या नगराध्यक्षा तथा मंदिर समितीच्या पदसिध्द सदस्या सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी पंढरपूर लाईव्हवर याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय..! बघा व्हिडीओ


यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, काल श्रीविठ्ठलाच्या गाभार्‍यात एका महिला सुरक्षा रक्षकाला भाविकाकडून झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध व्यक्त करते. तेथील महिला सुरक्षा कर्मचारी यांची नेमणूक मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी व पांडुरंगाचे दर्शन त्यांना सुलभ व्हावे यासाठी केलेली आहे. परंतु या महिला भगिणींनाच भाविकांकडून अशाप्रकारे उध्दट वागणुक मिळत असेल तर ते चुकीचे आहे. मंदिर समितीकडून येथील महिला कर्मचार्‍यांच्या सुरक्षीततेसाठी व त्यांच्या सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी ठोस पावले उचलणं आवश्यक आहे. यासाठी मी स्वत: प्रयत्न करीन. असे आश्‍वासन त्यांनी पंढरपूर लाईव्हकडे बोलताना दिले. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments